National Wrestling Championships 2024 (Women’s) : दोन वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिपची कांस्यपदक विजेती विनेश फोगट 16 महिन्यांच्या दुखापतीनंतर मॅटवर परतली. रविवारी जयपूर येथे झालेल्या सीनियर नॅशनल रेसलिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये तिने महिलांच्या 55 किलो फ्रीस्टाइलमध्ये सुवर्णपदक जिंकले.
राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिप 2024 मध्ये 55 किलो वजनी गटाचे विजेतेपद जिंकण्यासाठी विनेशने ज्योतीला पराभूत करण्यासाठी दोन मिनिटांपेक्षा कमी वेळ घेतला. विनेशने या लढतीत मध्य प्रदेशच्या ज्योतीवर 4-0 असा विजय मिळवला. विनेशने या स्पर्धेत रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाचे प्रतिनिधित्व केले.
विनेशने 2022 मध्ये बेलग्रेड येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत शेवटचा भाग घेतला होता, जिथे तिने कांस्यपदक जिंकले होते. गुडघ्याच्या दुखापतीमुळे तिने गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेतला नव्हता. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये विनेशच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती आणि ती डिसेंबरमध्येच प्रशिक्षणासाठी परतली होती.
या सामन्यातील विजयानंतर विनेश फोगटला ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिकने सुवर्णपदक प्रदान केले. साक्षी आणि विनेश या दोघींनी हे फोटो आपपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केले आहे.
You are a fighter…..
what a comeback @Phogat_Vinesh
Congratulations for the gold medal in the Senior National Championship 🥇🤩 pic.twitter.com/oNqriPJ8vX— Sakshee Malikkh (@SakshiMalik) February 4, 2024
अन्य लढतीत 2021 वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि 2022 कॉमनवेल्थ गेम्स रौप्यपदक विजेती अंशू मलिक महिलांच्या 59 किलो वजनी गटात पोडियमवर अव्वल ठरली. तिने चार वेळा आशियाई पदक विजेती सरिता मोरचा 8-3 असा पराभव केला. 2010 आशियाई चॅम्पियनशिप आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या निर्मलाने 23 वर्षांखालील आशियाई चॅम्पियन नीलमचा पराभव करून 50 किलो वजनी गटाचे विजेतेपद पटकावले.
National Wrestling Championships 2024 : ग्रीको-रोमन कुस्तीमध्ये ‘सुनील कुमार’ची सुवर्ण कामगिरी….
स्पर्धेतील इतर सर्व महिला पदक विजेत्यांची नावे….
(1. सुवर्णपदक, 2. रौप्यपदक, 3. कांस्यपदक)
50 किलो : 1. निर्मला, 2. नीलम, 3. सोनिया चौधरी, अंजू
53 किलो : 1. अंकुश, 2. ज्योति, 3. कविता माली, स्वाति
55 किलो : 1. विनेश, 2. ज्योति, 3. स्वाति, तमन्ना
57 किलो : 1. अंजू, 2. तपस्या, 3. शिल्पा, भानु
59 किलो : 1. अंशू, 2. सरिता, 3. दीप्ति, अंजलि
62 किलो : 1. मानसी, 2. सोनिका कुमारी, 3. सविता, सीमा
65 किलो : 1. सोनाली, 2. दीक्षा मलिक, 3. भतेरी, प्रियंका
68 किलो : 1. निशा, 2. राधिका, 3. प्रियंका, अन्नू
72 किलो : 1. ज्योति, 2. निक्की, 3. जशनबीर कौर, प्रियंका
76 किलो : 1. रीतिका, 2. सुनेना, 3. मंजू, हर्षिता