National Wrestling Championships 2024 : आशियाई खेळ 2023 कांस्यपदक विजेता सुनील कुमारने शनिवारी जयपूर येथे राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिप 2024 मध्ये ग्रीको-रोमन 87 किलो गटात सहज विजय मिळवला. सुनीलने 87 किलो गटात मनोज कुमारचा 9-1 असा पराभव करून विजेतेपदावर कब्जा केला. सामन्यादरम्यान आशियाई चॅम्पियनने दमदार कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले.
दुसरीकडे, माजी जागतिक कॅडेट चॅम्पियन सूरज वशिष्ठ 60 किलो गटाच्या अंतिम फेरीत ज्ञानेंद्रकडून 3-2 असा पराभूत झाला. त्यामुळे त्याला सुवर्णपदकापासून वंचित राहवं लागले. 103 किलो ग्रीको-रोमन प्रकारात नवीनने हरदीपचा 5-1 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले.
ज्ञानेंद्रने पूर्वार्धातच चपळाई दाखवत 3-0 अशी आघाडी घेतली. सूरजने वेळेवर घेतलेल्या रेफरलने ज्ञानेंद्रची दोन गुणांची आघाडी हिरावून घेतली. सूरजने शेवटच्या सेकंदात ज्ञानेंद्रवर शेवटची चाल केली, ज्याचा ज्ञानेंद्रने धैर्याने सामना केला आणि सूरजला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
#FIHProLeague24 (Women’s) : सलामीच्या लढतीतच चीनचा भारताला पराभवाचा धक्का…
राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिप 2024 ग्रीको-रोमन पदक विजेते…
55 किलो : 1. विश्वजीत, 2. संजीव, 3. रोहित यादव, मंजीत
60 किलो : 1. ज्ञानेंद्र, 2. सूरज, 3. विक्रम कुराडे, प्रवीण
63 किलो : 1. सन्नी कुमार, 2. शमशेर सिंह, 3. उमेश, संदीप कुमार
67 किलो : 1. आशु, 2. सचिन सहरावत, 3. विनायक पाटिल, विनय
72 किलो : 1. कुलदीप मलिक, 2. समीर, 3. विशाल, अंकित गुलिया
77 किलो : 1. विकास, 2. करण, 3. तरूण, राहुल
82 किलो : 1. राहित दहिया, 2. नीरज, 3. शिवाजी, लवप्रीत सिंह
87 किलो : 1. सुनील कुमार, 2. मनोज कुमार, 3. रोहित बूरा, रविंदर खत्री
97 किलो : 1. नितेश, 2. कपिल, 3. नरिंदर चीमा, सुनील
130 किलो : 1. नवीन, 2. हरदीप, 3. तुषार, मेहर सिंह