सुनयना कुरुविला व जोश्ना चिनप्पा यांच्यात अंतिम लढत

-एमएसआरए 76वी वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॅश अजिंक्‍यपद स्पर्धा
-पुरुष गटात महेश माणगावकर व अभिषेक प्रधान यांच्यात अंतिम लढत

पुणे – एमएसआरए-76व्या वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॅश अजिंक्‍यपद स्पर्धेच्या महिला गटात तामिळनाडूच्या जोश्ना चिनप्पा, सुनयना कुरुविला यांनी तर, पुरूष गटात महाराष्ट्राच्या महेश माणगावकर, अभिषेक प्रधान या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

अमनोरा मॉल ग्लास कोर्ट, आयस्क्वॅश अकादमी, चंचला संदीप कोदरे स्पोर्टस्‌ क्‍लब, मुंढवा, आणि आरएसआय येथील स्क्वॅश कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत महिला गटात अव्वल मानांकित तामिळनाडूच्या जोश्ना चिनप्पा हिने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत दिल्लीच्या चौथ्या मानांकित तन्वी खन्नाचा 11-4, 12-10, 11-8 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.

दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत तिसऱ्या मानांकित तामिळनाडूच्या सुनयना कुरुविला हिने दिल्लीच्या पाचव्या मानांकित सान्या वत्सचा 10-12, 5-11, 11-6, 11-7, 11-7 असा संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरी गाठली गाठली. अंतिम फेरीत सुनयना कुरुविला अव्वल मानांकित जोश्ना चिनप्पाचे आव्हान असणार आहे.

पुरुष गटात उपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या अव्वल मानांकित महेश माणगावकर याने आपली विजयी मालिका कायम ठेवत आपलाच राज्य सहकारी वीर चत्रानीचा 11-6, 11-4, 11-2असा पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्‍चित केले. दुसऱ्या मानांकित महाराष्ट्राच्या अभिषेक प्रधान याने तिसऱ्या मानांकित अभिषेक अगरवालचा 11-3, 11-7, 11-9 असा पराभव करून आगेकूच केली.

सविस्तर निकाल :

महिला गट : उपांत्य फेरी :

जोश्ना चिनप्पा(तामिळनाडू)1वि.वि.तन्वी खन्ना(दिल्ली)4 11-4, 12-10, 11-8;
सुनयना कुरुविला(तामिळनाडू)3वि.वि. सान्या वत्स(दिल्ली)510-12, 5-11, 11-6, 11-7, 11-7;

पुरुष गट: उपांत्य फेरी:

महेश माणगावकर(महाराष्ट्र)1वि.वि.वीर चत्रानी(महाराष्ट्र) 11-6, 11-4, 11-2;
अभिषेक प्रधान(महाराष्ट्र)2वि.वि.अभिषेक अगरवाल(महाराष्ट्र)311-3, 11-7, 11-9

Leave A Reply

Your email address will not be published.