भगवान राम मुस्लिमांचेही पूर्वज, अयोध्येतच मंदिर उभारणार – रामदेव बाबा  

नांदेड – भगवान राम केवळ हिंदू आणि मुस्लिम नव्हे तर संपूर्ण राष्ट्रांचे पूर्वज आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आपणास राम मंदिर विवाद सोडविण्यास ‘मध्यस्थ’ म्हणून नियुक्त केले आहे. परंतु याचा काही परिणाम होताना दिसत नाही. योगगुरू बाबा रामदेव म्हणाले की, राम मंदिर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच बांधले जाईल. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रामदेव बाबा यांनी आज नांदेडमध्ये योगसाधना केली. त्यावेळी ते बोलत होते.

रामदेव बाबा म्हणाले कि, हिंदू आणि मुसलमानांचे डीएनए एकच आहे. मुस्लिम आमचे भाऊ असून आमचे पूर्वज एक आहेत. राम केवळ हिंदूंचे पूर्वज नव्हे तर मुस्लिमांचेही पूर्वज आहेत. आपण आपल्या पूर्वजांचा अनादर करू नये. राम मंदिर बांधण्याचे दोन मार्ग आहेत कि, सर्वोच्च न्यायालय लवकरात लवकर याप्रकरणावर निर्णय घेईल. दुसरा पर्याय म्हणजे  जनताच राम मंदिर निर्मितीचे कार्य हाती घेईल त्यांना रोखणे कुणालाही शक्य होणार नाही असेही बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.