National Kabaddi Tournament – राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाची घोषणा करण्यात आली. नाशिकच्या बिंदिसा सोनार हिच्याकडे महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. सांगलीच्या श्रावणी भोसले हिची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेकडून महाराष्ट्राचा संघ जाहीर करण्यात आला.
यंदा अंतिम विजयी ठरलेल्या जालन्याच्या तीन मुलींचा या संघात समावेश करण्यात आला आहे. पाटणा, बिहार येथील पाटली पुत्र क्रीडा संकुलात ३१ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा होणार आहे. पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या मुले व मुलींच्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतून ४० खेळाडूंची सराव शिबिराकरिता निवड करण्यात आली होती.
या खेळाडूंचे सराव शिबिर अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेच्या सहकार्याने नेवासा येथे आयोजित करण्यात आले. शिबिरातील ४० खेळाडूंमधून राष्ट्रीय स्पर्धेकरिता १२ जणांचा संघ निवडण्यात आला.
महाराष्ट्राचा मुलींचा संघ – १) बिंदिसा सोनार (कर्णधार) – नाशिक शहर २) श्रावणी भोसले (उपकर्णधार) – सांगली ३) मोनिका पवार – जालना ४) राणी भुजंग – जालना ५) साक्षी जाधव – परभणी ६) भाग्यश्री गायकवाड – जालना ७) तनिष्का बोरकर – पिंपरी-चिंचवड ८) समीक्षा पाटील – नंदुरबार ९) मुग्धा शिर्के – रत्नागिरी १०) संस्कृती सुतार – सातारा ११) दृष्टी कुंभार – मुंबई शहर पश्चिम १२) आरती शेळके – ठाणे. प्रशिक्षक – ज्ञानेश्वर ठोंबरे – परभणी. सहायक प्रशिक्षक – अशोक पानकडे – अहमदनगर. व्यवस्थापिका – सुवर्णा लोखंडे – अहमदनगर.