पुणे – मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संगठन या राष्ट्रीय संघटनेच्या वतीने मानव अधिकार कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन बालेवाडी येथे करण्यात आले होते.
या प्रशिक्षण शिबीरामध्ये फौजदारी कायदे, न्यायालयीन प्रक्रिया व मानवअधिकार या विषयावर ऍड. सादीकाली सय्यद व सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक महादेव पवार यांनी मार्गदर्शन केले.
सामाजिक चळवळीमध्ये कार्यकर्त्यांची भुमिका या विषयांवर यशदा पुणे येथिल प्रभारी अधिकारी डॉ. बबनराव जोगदंड यांनी मार्गदर्शन केले. माहीती अधिकार कार्य व प्रक्रिया या विषयांवर दिलीप कुन्हाडे व माहीती अधिकार कार्यकर्ते रणजितसिंह दुधे इनामदार यांनी मार्गदर्शन केले तसेच वाहन कायदा या विषयांवर सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व राष्ट्रपती पुरस्कार मिळालेले संपत जाधव यांनी मार्गदर्शन केले.
पोलीस निरीक्षक अजय जोगदंड यांनी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. या प्रशिक्षण शिबीरांस प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप व नगरसेवक शंकरभाऊ पवार उपस्थित होते. प्रशिक्षण शिबीर यशस्वी करण्याकरीता संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश केदारी, संपत जाधव, गणपतराव बालवडकर, सुजाता भाटे, अमर केदारी, किरण घोलप, अशिष भालेराव,विलास भाटे, सदाशिव भगत, मनोज खोपडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
यानिमित्ताने मानव धिकार व भ्रष्टाचार निवारण संघठन चे राष्ट्रीय अध्यक्ष व संस्थापक मा डॉ सतीश केदारी व राष्ट्रीय उपाध्यक्ष मा संपतराव जाधव यांच्या हस्ते श्री सदाशिव नानासाहेब भगत यांना मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघठन या संघटनेच्या ( सचिव- महाराष्ट्र राज्य कायदा व सुव्यवस्था ) या पदावर नियुक्तीपत्र देऊन त्यांना त्यांच्या भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या.