नवी दिल्ली – भारताच्या नीरज चोप्राने आज टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेक क्रीडा प्रकारामध्ये सुवर्ण पदक पटकावले. देशभरामध्ये आज नीरज या दैदिप्यमान यशामुळे जल्लोषाचे वातावरण आहे. ठिकठिकाणी लोक रस्त्यावर उतरले असून ‘भारत माता कि जय’ असा जयघोष करत हे यश साजरी केलं जातंय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील नीरजच्या या यशाचं तोंडभरून कौतुक केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून नीरजला शुभेच्छा संदेश दिले. पंतप्रधान मोदी लिहतात, “टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत आज इतिहास घडवला गेला. नीरज चोप्राने आज जे यश प्राप्त केलं, ते सदैव स्मरणात राहील. नीरजने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन केले. तो प्रचंड जिद्दीने खेळला आणि जिंकला. सुवर्ण पदक जिंकल्याबाबत त्याचे अभिनंदन.”
History has been scripted at Tokyo! What @Neeraj_chopra1 has achieved today will be remembered forever. The young Neeraj has done exceptionally well. He played with remarkable passion and showed unparalleled grit. Congratulations to him for winning the Gold. #Tokyo2020 https://t.co/2NcGgJvfMS
— Narendra Modi (@narendramodi) August 7, 2021
दरम्यान, नीरजाच्या या यशानंतर त्याच्यावर सर्वच क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील नीरजच्या या यशाचं कौतुक केले आहे.
राष्ट्रपती कोविंद लिहतात, “मैदानीखेळातील हे भारतासाठीचे हे पहिलेच सुवर्ण पदक. नीरजने आपल्या कारकिर्दीतील पहिल्याच ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पटकावले. त्याची कामगिरी युवकांसाठी प्रेरणादायी ठरेल. शुभेच्छा.”
History has been scripted at Tokyo! What Neeraj Chopra has achieved today will be remembered forever. The young Neeraj has done exceptionally well. He played with remarkable passion and showed unparalleled grit. Congratulations to him for winning the Gold: PM Narendra Modi pic.twitter.com/L46HrDOogk
— ANI (@ANI) August 7, 2021