मडगाव : महाराष्ट्राच्या महिला टेनिस संघाला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. दोन्ही एकेरीचे सामने गमावल्यामुळे अंतिम फेरीत महाराष्ट्राने गुजरातकडून ०-२ अशी हार पत्करली.
गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या स्टेडियमवर चालू असलेल्या टेनिस स्पर्धेतील महिला सांघिक गटाच्या पहिल्या एकेरी सामन्यात गुजरातच्या वैदेही चौधरीने महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरला ६-३, ६-० असे नमवले. मग दुसऱ्या एकेरीच्या सामन्यात गुजरातच्या अंकिता रैनाने महाराष्ट्राच्या रूतुजा भोसलेचा ६-४, ६-४ असा पराभव केला.
National Games 2023 (Archery) : महाराष्ट्राच्या पुरुष संघाची पदकनिश्चिती…
रूतुजा-प्रार्थना जोडी उपांत्य फेरीत…
महाराष्ट्राच्या रूतुजा भोसले आणि प्रार्थना ठोंबरे जोडीने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमधील टेनिसच्या महिला दुहेरी गटाची उपांत्य फेरी गाठली आहे. रूतुजा-प्रार्थना जोडीने गोव्याच्या श्रेया पसरिचा आणि प्रेरणा अॅपिनेनी जोडीला ६-०, ६-३ असे सरळ सेटमध्ये नामोहरम केले.