नाथाभाऊंनी ‘त्यां’चे नाव माझ्या कानात सांगावे – गिरीश महाजन

मुंबई – भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यामुळेच तिकीट न मिळाल्याचा आरोप केला होता. मात्र, गिरीश महाजन यांनी खडसे यांना कुणीतरी चुकीची माहिती दिली असल्याचे म्हंटले आहे. तसेच त्यांनी जाहीरपणे त्या व्यक्तीचं नाव सांगण्यास नकार दिला असला, तरी त्यांनी माझ्या कानात त्या व्यक्तीचं नाव सांगावे, असे आवाहनही गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना केले आहे.

गिरीश महाजन म्हणाले कि, खडसे यांना कुणीतरी चुकीची माहिती दिलेली आहे. आमच्या बैठकीत त्यांच्याबाबत कोणताही विषय झाला नाही. केंद्रीय समितीत एकूण अठरा सदस्य होते. त्यांनीच तिकीटाविषयीचा निर्णय घेतला. त्यात आमचा कोणताही संबंध नाही. खडसे यांनाच तिकीट नाकारण्यात आले असंही नाही. चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यांच्यासह अनेक जणांना तिकीट दिले गेले नाही. खडसे यांच्या घरात पक्षाने तिकीट दिले होते. त्यामुळे त्यांनी केलेला आरोप चुकीचा आहे. तसेच खडसेंनी पुरावा दिला, तर पक्ष देईल ती शिक्षा घेण्यास मी तयार आहे. पण कोणताही पुरावा नसताना आरोप करणे म्हणजे आमच्यावर अन्याय आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे काही काळापासून पक्षावर नाराज आहेत. ही नाराजी त्यांनी वारंवार उघडपणे बोलूनही दाखविली आहे. त्यानंतर आता भाजपकडून एकनाथ खडसे यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.