‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’चा दुसरा ट्रेलर प्रदर्शित
नवी दिल्ली- मॅन व्हर्सेस वाईल्ड या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच झळकणार आहेत. ही माहिती काही दिवसापूर्वी या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक बेअर ग्रिल्सने ट्विटरवरुन दिली होती. या शोचा नवा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला असून काही कालावधीमध्येच तो लोकप्रियही झाला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना बेअर ग्रिल्सने म्हटले की,’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पर्यावरणावर प्रचंड प्रेम आहे. त्यांना अगदी मनापासून निसर्ग आणि पर्यावरण आवडतो. माझ्या सोबत असताना त्यांनी निसर्गासंदर्भातील संवाद साधला.’
#WATCH Bear Grylls in Wales(United Kingdom): I’ve had a huge privilege of taking Pres Obama on a trip to Alaska a few years ago..what was similar(Obama&PM Modi) was that they were there for the same purpose- for driving this message of ‘we have to protect the environment. ‘ pic.twitter.com/pbVDBvhypk
— ANI (@ANI) August 10, 2019
दरम्यान, जगभरातील 180 देशांच्या लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींची याआधी कधीही न पाहिलेली बाजू पहायला मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर बेअर ग्रिल्सने वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत ग्रिल्सने नरेंद्र मोदी यांना निसर्ग अगदी मनापासून आवडतो असेही म्हटले आहे.