मुंबई – फेमिना मिस इंडिया 2023 चा मुकुट जिंकलेली राजस्थानची नंदिनी गुप्ता वयाच्या 19 व्या वर्षी 59 वी मिस इंडिया बनली. नंदिनीने स्वःताचे स्वप्न पूर्ण केले. यावेळी मणिपूरमध्ये फेमिना मिस इंडिया 2023 चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कार्तिक आर्यन आणि नेहा धुपियासारखे कलाकार उपस्थित होते. नंदिनीचे वडील व्यवसायाने शेतकरी आहेत. अभ्यासासोबतच नंदिनीने आपले स्वप्न कधीच सोडले नाही आणि ऑफिस मॅनेजमेंट करण्यासाठी मुंबईत आली.
मिस इंडियाचा ताज जिंकल्यानंतर नंदिनी आता मिस वर्ल्डमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची तयारी करत आहे. मिस इंडिया होण्याचे स्वप्न ऐश्वर्या रायला पाहून तिला कळले होते आणि दुसरीकडे ती प्रियांका चोप्राला आपला आदर्श मानते. अशात वृत्त माध्यमांशी बोलतांना नंदिनी गुप्ता म्हणाली,’हिंदी चित्रपटसृष्टीत संधी मिळाली तर नक्कीच काम करायला आवडेल. मला रणबीर कपूर खूप आवडतो आणि त्याच्यासोबत काम करायचे आहे. रणबीर कपूरच्या ‘ये जवानी है दिवानी’ या सुपरहिट चित्रपटाचे कौतुक करताना नंदिनी म्हणाली की, मला या चित्रपटातील त्याचा अभिनय खूप आवडतो.’