नांदेड : जिल्ह्यात 31 मार्च रोजी 3 हजार 918 तपासण्यांमधून 1 हजार 079 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून यापैकी मनपा हद्दीतील रुग्ण संख्या 599 आहे. रूग्णांची संख्या वाढत असल्याने जनतेने काळजी व सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.
आज 854 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहे. तसेच आज 24 रुग्णांच्या मृत्यूची नाेंद झालेली आहे.