खासगी हॉस्पिटलकडून उदासिनता
पुणे – केंद्र शासनाने करोना लसीकरण मोहिमेत देशातील खासगी तसेच शासकीय वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार, देशभरातून या कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात येत आहे. मात्र, शहरात खासगी वैद्यकीय कर्मचारी तसेच वैद्यकीय अस्थापना या लसीकरणाबाबत उदासीन असल्याचे समोर आले आहे.
महापालिकेकडून वारंवार आवाहन करूनही या नोंदणीसाठी नावेच दिली जात नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
शहरात शासकीय तसेच खासगी अशी सुमारे 800 वैद्यकीय अस्थापना असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
वारंवार सूचना देऊनही खासगी हॉस्पिटलकडून या लसीकरणासाठी नोंदणी करण्याबाबत उदासिनता दाखविली जात आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा सर्व हॉस्पिटला सूचना करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.