जाहिरात फलकांवर देशविरोधी घोषणा लिहील्याने नागपुरात खळबळ

नागपूर – महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपुरात आज कोणी अज्ञात व्यक्तीने जाहिरात फलकांवर देशविरोधी घोषणा आणि अपशब्द लिहील्याने एकच खळबळ उडाली आहे. नागपूर ते अमरावती महामार्गावर असणाऱ्या भोळे पेट्रोल पंप चौक ते म्हाडा क़ॉलनी दरम्यानच्या जाहिरात फलकांवर या घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर तात्काळ या घोषणा पुसण्यात आल्या आहेत.

नागपूर ते अमरावती महामार्गावर असणाऱ्या भोळे पेट्रोल पंप चौक ते म्हाडा क़ॉलनी दरम्यानच्या लोखंडी फलकावर अज्ञातांनी हिंदूस्तान मुर्दाबाद, हिंदुस्तान सरकार मुर्दाबाद अशा देशविरोधी घोषणा लिहिल्या होत्या. स्थानिकांना अशा घोषणा दिसून आल्यावर त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती कळवली. यानंतर पोलिसांनी परिसरात चौकशी केली असून, पुढील कारवाई करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.