वाटमारी करणाऱ्यांना नागरिकांनीच दिला चोप

पिंपरी – नागरिक देखील एखाद्या गुन्ह्याला वेळीच जरब बसवून आरोपींना पोलिसांच्या हवाली करु शकतात, याचे उत्तम उदाहरण शनिवारी (दि.6) पिंपरी पोलिसांना पहायला मिळाले.

चिंचवड येथील टेल्को रोडवर शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास चार जण नागरिकांना अडवून कोयत्याचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न करीत होते. नागरिकांनी एकत्र येत या टोळक्‍याला पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यातील एकाने कोयत्याचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली, मात्र नागरिकांनी एकत्र येत त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यातील दोन जण फरार झाले. तर दोघांना पकडून नागरिकांनी चांगलाच चोप दिला.

दरम्यान तेथील नागरिकांनी पोलिसांना फोन करुन सर्व प्रकार कळवल्यानंतर पिंपरी पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले व त्यांनी पकडलेल्या आरोपींना ताब्यात घेतले. प्रितम रमेश राठोड (वय-18) व शरद चव्हाण (वय-25) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून शशिकांत वाघ (वय-21) व मोन्या मोरे (वय-20) हे दोघे फरार झाले आहेत. पिंपरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.