श्री तिरूपती नागरी पतसंस्थेचे मतदान करणाऱ्या सभासदांना उत्तेजन

आकर्षक ठेव व कर्ज योजना सादर

पुणे – श्री तिरूपती नागरी सहकारी पतसंस्थेने मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडणाऱ्या संस्थेच्या सभासद बंधु-भगिनींचे सन्मानार्थ 23 एप्रिल ते 30 एप्रिल यादरम्यान सर्व कायम व पुनर्गुंतवणूक ठेवींवर 0.25 टक्‍के (पाव टक्‍का) जास्त व्याजदर तर सोने तारण व वाहन तारण कर्जावर 0.25 टक्‍के (पाव टक्‍का) कमी व्याजदर आकारण्यात येणार आहे.

संस्थेने मार्च 2019 अखेर 100 कोटी ठेवींचे उद्दिष्ट ठेवले होते. 31 मार्च 2019 अखेर संस्थेची सांपत्तिक स्थिती चांगली आहे. संस्थेचे भागभांडवल 3 कोटी 71 लाख, ठेवी 101 कोटी 82 हजार, कर्जवाटप 65 कोटी 66 लाख, खेळते भांडवल 113 कोटी 60 लाख, गुंतवणूक 37 कोटी 28 लाख तर नफा 87 लाख 65 हजार एवढे आहे, असे श्री तिरूपती नागरी सहकारी पतसंस्थेच्या महाव्यवस्थापकानी कळविले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.