सिरीयामध्ये जिहादीच्या हल्ल्यात सरकारी फौजांमधील 22 सैनिक ठार

बैरुत – सिरीयामधील उत्तरेकडील अलेप्पो शहरात आज पहाटेच्या सुमारास दोन जिहादी गटांनी सरकारी फौजांवर केलेल्या हल्ल्यात किमान 22 सैनिक ठार झाले. या चकमकीमध्ये अन्य 30 जण जखमी झाले. अल कायदाशी संबंधित सिरीयातील दहशतवादी गट हयात ताहिर अल शम आणि हुर्रास अल दीन या दहशतवादी संघटनांनी हे हल्ले क्केले होते, असे ब्रिटनस्थित मानवाधिकार विषयक निरीक्षक गटाने म्हटले आहे.

दक्षिण आणि नैऋत्येकडील अलेप्पो प्रांतात मध्यरात्रीनंतर या जिहादी गटांनी हल्ला केला आणि पहाटेपर्यंत ही चकमक सुरू होती, असे निरीक्षक रामी अब्देल रहमान यांनी सांगितले. या चकमकीमध्ये रशियाच्या लढाऊ विमानांनी जिहादींच्या अड्डयांवर हल्ला केल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी 8 जिहादीही मारले गेले.

रशियाच्या विमानांनी शनिवारी शेजारील हामा प्रांतात हल्ले केले, त्यात 5 नागरिक मारले गेले. शुक्रवारी रशियाच्या हल्ल्यात 10 नागरिक इडलीब प्रांतात मारले गेले आहेत.
रशिया आणि बंडखोरांना पाठिंबा देनाऱ्या तुर्कीने सिरीयातील काही ठराविक भागात परस्परविरोधी हल्ले न करण्याबाबत एक करार केला होता. मात्र या कराराची कधीही अंमलबजावणी झाली नव्हती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.