मोदींचे केंद्रातील सरकार हे टक्केवारी घेणारे सरकार – कुमारस्वामी

मोदी सरकारचा 20 टक्के गव्हर्नमेंट असा केला उल्लेख
बंगलुरू – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार हे विविध कामांमध्ये टक्केवारी घेणारे सरकार आहे. सरासरी 20 टक्के कमिशन या सरकारला द्यावे लागते अशी वदंता आहे त्यामुळे हे 20 परसेंट गव्हर्नमेंट आहे अशी टीका कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केली आहे. पंतप्रधान मोदींनी गेल्या शुक्रवारी कर्नाटकातील सभेत कॉंग्रेस व जेडीएस सरकारवर टीका करताना हे मिशनचे नव्हे तर कमिशनचे सरकार आहे अशी टीका केली होती. त्यावर कुमारस्वामी यांनी हा पलटवार केला. ते म्हणाले की स्वता मोदींचे सरकार कमिशनवर चालत असल्याने त्यांना टक्केवारीच्या विषयाखेरीज अन्य विषयांवर बोलता येत नाही. त्यांची पार्श्‍वभूमीच टक्केवारीची आहे त्यामुळे ते या खेरीज ते काहीच बोलू शकत नाहीत असे कुमारस्वामी म्हणाले.

ते आज येथे वार्ताहरांशी बोलत होते. मोदींनी कर्नाटकातीाल जेडीएसच्या नेत्यांवर छापे घालून आम्हाला घाबरण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे पण आम्ही जर काहींच चुकीचे केलेले नाही तर आम्हाला अशा छाप्यांमार्फत घाबरवण्याचा त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरणार आहे असे ते म्हणाले. मोदींनी प्रचाराची पातळी घसरवली आहे पण आम्ही त्या पातळीवर उतरणार नाहीं असेहीं त्यांनी नमूद केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.