निघोज – बाभूळवाडे आणि परिसरात आपलं गाव फौंउंडेशन माध्यमातून मोठ्या प्रमाणात सामाजिक कामे झाली असून धार्मिक, शैक्षणिक, वैदयकीय, सामाजिक क्षेत्रात फौंडेशनचे काम कौतुकास्पद आहे. फौंडेशनचे अध्यक्ष डॉ.सुरेश खणकर यांचे संघटन महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते मुकुंदराव निघोजकर यांनी व्यक्त केले.
मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट, आपलं गाव गणपती समाजसेवा प्रतिष्ठान, निघोज ग्रामस्थ व मुंबईकर मंडळ , पारनेर तालुका पत्रकार संघ यांच्या वतीने आपलं गाव फाैं उडेशनचे अध्यक्ष डॉ. सुरेश खणकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त बबनराव ससाणे, आपलं गाव गणपती समाजसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवी रणसिंग, ज्येष्ठ मार्गदर्शक भास्करराव सोनवणे, पोपट महाराज देशपांडे, अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे पदाधिकारी सतीश साळवे, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे व्यवस्थापक महेश ढवळे, बाळासाहेब साळवे, ॲड. बाळासाहेब पवार, पारनेर तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष दत्ता उनवणे आदी उपस्थित होते.