बेल्हे – नगर- कल्याण महामार्गावर मध्यरात्री दुचाकी झाडाला आढळून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
समीर बाळू जाधव (वय 19) असे मृत्यू झालेल्याचे तर प्रकाश अशोक जाधव (दोघे ही रा. पळशी, ता.पारनेर) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. तर प्रकाश जाधव (वय 20 रा. पळशी ता.पारनेर) यांनी फिर्याद दिली आहे.
शिरोली या गावी दोघे जण मोटारसायकल (एमएच 16 एयू 0152) वरून पारनेरकडून शिरोलीच्या दिशेने जात असताना त्यांची मोटारसायकल नगर-कल्याण महामार्गावरील पेमदरा गावाजवळ रस्त्याच्या कडीला असलेल्या वडाच्या झाडाला धडकल्याने समीर जाधव यांचा मृत्यू झाला.