नेवासा : मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची गुरुवार (दि.२३) रोजी सकाळी १० वाजता नेवासा शहरातील नगरपंचायत चौकात सकल मराठा समाजाच्यावतीने जाहिर सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहीती सकल मराठा समाज्याच्यावतीने देण्यात आली.
मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपञ मिळण्यासाठी मनोज जरांगे – पाटील यांनी राज्यात लढा पुकारुन सरकारला धारेवर धरत मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपञ मिळण्यासाठी लढा पुकारलेला असून जरांगे – पाटील यांनी राज्यात दौरा सुरु केलेला आहे.
नेवासा शहरात सकल मराठा समाजाच्यावतीने जरांगे – पाटील यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी नेवासा गणपती चौकात साखळी उपोषण सुरु केलेले होते.
गुरुवारी (दि.२३) रोजी सकाळी १० वाजता नेवासा नगरपंचायत चौकात जरांगे – पाटील यांची जाहिर सभेचे आयोजन करण्यात आलेले असून सभेची पुर्ण जय्यत तयारी सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आलेली असून नगरपंचात चौकात ही सभा होणार असल्याची माहीती सकल मराठा समाजाच्यावतीने देण्यात आलेली आहे.