नगर (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्रावर जाणे अशक्य असलेल्या ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना घरून मतदान करता येणार आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाने ही सुविधा मतदारास दिली आहे. यामध्ये शिर्डी मतदारसंघात ७०० मतदार हे ८५ वर्षापेक्षा जादा वयाचे आहेत. यात ५९५ हे वयोवृध्द तर १०५ हे दिव्यांग मतदार आहेत.
तर नगर मतदारसंघात ६४८ वयोवृध्द आणि १०० हे दिव्यांग मतदार आहेत. असे जिल्ह्यात १ हजार २४३ मतदारांना घरूणच मतदान करता येणार आहे. या सर्वासाठी प्रशासनाकडून ७६ गृह मतदान पथक नियुक्त करणत आले आहेत.
जिल्ह्यात मागील वेळी ६४ टक्के मतदान झाले होते. यंदा ते ७५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रयत्न राहणार प्रशासनाकडून सुरु आहे. गृह मतदानाची सुविधा ७ मे ते ९ मे दरम्य़ान राबविली जाणार आहे. गृहमतदानासाठी पात्र मतदारांची यादी व गृह भेटीचे वेळापत्रक सर्व निवडणूक लढविणार्या उमेदवारांना पुरविण्यात येणार आहे.
तसेच जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर ४ त ७ मे दरम्यान मतदानाची तयारी करण्याची सुचना करण्यात आली असून त्यावेळी मतदान यंत्रे जोडून तपासणी करण्यासोबत राजकीय पक्षांच्या उपस्थितीत मॉपपोल घेण्यात येणार आहे. त्यानंतर ही प्रक्रीया पार पाडली जाणार आहे.