नगर -नगर जल्लोष ट्रस्ट परिवारातर्फे यंदाचे “चेंज मेकर्स अवॉर्ड 2020′ आज जाहीर करण्यात आले. शहराच्या 530 व्या स्थापनादिनी हे ऍवॉर्ड सन्मानपूर्वक प्रदान केले जाणार असल्याची माहिती नगर जल्लोष ट्रस्ट परिवाराचे अध्यक्ष सागर बोगा यांनी दिली. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, डॉ. अमोल बागूल व हरजीतसिंह वधवा यांचा पुरस्कारार्थींमध्ये समावेश आहे, असल्याचे त्यांनी सांगितले.
दहा वर्षापासून नगर शहराच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रामध्ये विविध उपक्रम राबविणाऱ्या नगर जल्लोष परिवार ट्रस्टतर्फे यावर्षी लॉकडाऊन कालावधीत स्वतःचा जीव धोक्यात घालून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या करोना योद्ध्यांचा त्यांच्या कार्यालयात जाऊन सन्मान केला जाणार आहे. प्रशासनाचे नियम पाळून मानपत्र, वृक्ष, सॅनीटायझर व मास्क असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यासाठी रत्नाकर श्रीपत, अजय म्याना, संतोष दरांगे, सचिन बोगा, अक्षय अंबेकर, सुनील मानकर, राकेश बोगा, गणेश साळी, दीपक गुंडू, रोहित लोहार, महेश बल्ला, नीलेश मिसाळ, योगेश म्याकल, प्रशांत भंडारी, सुमित ईप्पलपेल्ली, विकास जाधव, विराज म्याना, ज्ञानेश्वर भगत आदी परिश्रम घेत आहेत.