नगर (प्रतिनिधी) – नगर शहर व जिल्ह्यात करोनाबाधित होणार्या रुग्णसंख्येचा आलेख उंचावत असतानाच आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्याही समाधानकारक आहे. नगर जिल्ह्यात आत्तापर्यंत …. एवढे रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तथापि, नगरकरांची चिंता कायम असून, आज नव्याने 3 हजार 780 रुग्ण करोनाबाधित झाले असल्याची आकडेवारी जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे.
जिल्ह्यात आज 3 हजार 225 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 30 हजार 938 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 83.93 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्णसंख्येत 3 हजार 225 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्या रुग्णांची संख्या आता 23 हजार 302 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 999, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 1हजार 101 आणि अँटीजेन चाचणीत 1 हजार 680 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 207, अकोले 64, जामखेड 107, कर्जत 61, कोपरगाव 47, नगर ग्रामीण 39, नेवासा 44, पारनेर 87, पाथर्डी 46, राहता 69, राहुरी 09, संगमनेर 92, शेवगाव 37, श्रीगोंदा 06, श्रीरामपूर 48, कँटोन्मेंट बोर्ड 26 आणि मिलिटरी हॉस्पिटल 08 आणि इतर जिल्हा 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 501, अकोले 11, जामखेड 03, कर्जत 13, कोपरगाव 11, नगर ग्रामीण 122, नेवासा 18, पारनेर 05, पाथर्डी 27, राहाता 97, राहुरी 23, संगमनेर 133, शेवगाव 21, श्रीगोंदा 10, श्रीरामपूर 67, कँटोन्मेंट बोर्ड 27 आणि इतर जिल्हा 11 आणि इतर राज्य 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज 1680 जण बाधित आढळुन आले. मनपा 262, अकोले 40, जामखेड 28, कर्जत 63, कोपरगाव 93, नगर ग्रामीण 215, नेवासा 184, पारनेर 93, पाथर्डी 35, राहाता 141, राहुरी 151, संगमनेर 72, शेवगाव 81 श्रीगोंदा 139, श्रीरामपूर 43, कॅन्टोन्मेंट बोर्ड 26 आणि इतर जिल्हा 14 अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा 866, अकोले 136, जामखेड 48, कर्जत 234, कोपरगाव 150, नगर ग्रामीण 335, नेवासा 95, पारनेर 96, पाथर्डी 98, राहाता 272, राहुरी 184, संगमनेर 184, शेवगाव 164, श्रीगोंदा 45, श्रीरामपूर 188, कॅन्टोन्मेंट 62, मिलिटरी हॉस्पिटल 13 आणि इतर जिल्हा 55 अशा रुग्णांचा समावेश आहे.