नारायणडोहो – नगर- जामखेड रोडवर निंबोडी गावाजवळ असणाऱ्या पुलावर बस आणि कारची समोरासमोर धडक झाली. ही घटना
शनिवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली. कारमध्ये असणाऱ्या दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
पुणे- परळी ही बस (एमएच 14, बीटी 2418) नगरकडून परळीला जात होती, तर स्वीट स्विफ्ट कार बीडकडून नगरकडे जात असताना बसने समोरासमोर धडक दिली.
दुचाकीस्वाराने बसला ओव्हरटेक केल्याने बस चालकाने जोरात ब्रेक मारले. त्यामुळे बसचा उजव्या बाजूला तोल गेला अन् कारची उजवी बाजू पूर्णपणे डॅमेज झाली.
निंबोडी गावातील नागरिकांनी तातडीने कारमधील जखमींना बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात पाठविले. या अपघातामुळे महामार्गावर बऱ्याच वेळ वाहतूक झाली होती.