वॉशिंग्टन – मंगळ ग्रह हा नेहमीच आकर्षणाचे केंद्र ठरला आहे आणि या ग्रहाविषयीचे रहस्य सुद्धा संशोधकाना आकर्षित करत असते विविध देशांनी आपल्या मंगळ मोहिमा सुरू केल्या असून आता एका मंगळ मोहिमेमध्ये मंगळ ग्रहावरून एक अतिशय रहस्यमय छायाचित्र उपलब्ध झाले असून हे छायाचित्र नक्की कसले आहे याबाबत संशोधन सुरू आहे जे छायाचित्र मिळाले आहे.
ते वरून पाहता एखाद्या झाडाच्या खोडाप्रमाणे दिसत आहे तसेच हे छायाचित्र म्हणजे एखाद्या विशाल खड्ड्याचे छायाचित्र आहे की काय असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे या छायाचित्राचा सखोल अभ्यास करूनच शास्त्रज्ञांना या प्रश्नाचे निश्चित उत्तर मिळणार आहे युरोपियन स्पेस एजन्सीच्या एकसोमार्स ऑर्बिटरने हे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे हे ऑर्बिटर 2016 मध्ये मंगळ मोहिमेवर पाठवण्यात आले असून गेली चार वर्षे ते मंगळ ग्रहाला घिरट्या घालत आहे विविध प्रकारची छायाचित्रे या ऑर्बिटरतर्फे पृथ्वीवर पाठवण्यात येत आहेत.
तसेच हे छायाचित्र आले आहे एखादे झाडाचे खोड कापल्यावर त्याच्यावर ज्याप्रमाणे रेषा दिसतात त्याप्रमाणे रेषा या छायाचित्रात दिसत असल्यामुळे ते झाडाचे खोड आहे की काय याबाबत शंका उपस्थित केली जात आहे मात्र काही शास्त्रज्ञांच्या मते हे छायाचित्र खूप वरून घेतले असल्यामुळे ते एखाद्या विशाल खड्याचे पण असू शकते या खड्ड्यातील आतील बाजूला बर्फ साठले असण्याची शक्यता असून त्यामुळे या रेषा दिसत असाव्यात असे या शास्त्रज्ञांना वाटत आहे.
एकसोमार्स ऑर्बिटर हे मंगळ ग्रहावर प्रदक्षिणा घालत असतानाच मंगळावर पाण्याचा शोध घेण्याचे महत्वाचे काम करत आहे आणि त्या दिशेनेच ऑर्बिटर छायाचित्रे घेत असते ऑर्बिटरने पाठवलेल्या या ताज्या छायाचित्रांमुळे शास्त्रज्ञ उत्साहित झाले असून या छायाचित्राचा सखोल अभ्यास करून या चित्राचे रहस्य सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.