मुंबई- बॉलिवूडमध्ये राजकीय नेत्यांवरील बायोपिकचा ट्रेन्ड लक्षात घेता रोज नवनवीन नेत्यांच्या बायोपिकच्या घोषणा व्हायला लागल्या आहेत. डॉ.मनमोहन सिंग, नरेंद्र मोदी आणि जयललिता यांच्या बायोपिकनंतर आता, काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांच्या जीवनावरील बायोपिकदेखील प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. “माय नेम इज रागा” असं या सिनेमाचं नाव आहे.या सिनेमाचा टीजर आधीच प्रदर्शित करण्यात आला होता.मात्र, निवडणूक आयोगाने ‘पीएम नरेंद्र मोदी’ या सिनेमासह ‘माय नेम इज रागा’चंही प्रदर्शन लोकसभा निवडणूक काळात थांबवलं होतं. या सिनेमाचे दिग्दर्शक रुपेश पॉल यांनी केलं आहे.