नवी दिल्ली – ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाला देशामध्ये चांगली पसंती मिळाली आहे. तर काही भागामध्ये या चित्रपटाला विरोध देखील दर्शविण्यात आला आहे. अश्यातच ‘साथ निभाना साथिया’ च्या गोपी बहू म्हणजेच देवोलिना भट्टाचार्जी आणि तिचा पती शानवाज शेख या दोघांनी ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट बघितला आहे.
त्यानंतर तिने आपल्या पतीची चित्रपटाबद्दलची प्रतिक्रिया सर्वांशी शेअर केली असून, सध्या तिची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
काय आहे देवोलिना भट्टाचार्जीची पोस्ट?
अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी यांनी लिहिले कि “हे नेहमीच असे नसते. माझे पती मुस्लीम आहेत आणि ते माझ्यासोबत ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट पाहायला आले आणि त्यांनी चित्रपटाचे कौतुक केले.
त्याने तो गुन्हा म्हणून घेतला नाही किंवा तो आपल्या धर्माविरुद्ध आहे असे त्याला वाटले नाही. मला वाटते की प्रत्येक भारतीय असे असले पाहिजे.” अशी पोस्ट करत देवोने पोस्टसोबत ‘द केरळ स्टोरी’ हा हॅशटॅग देखील वापरला आहे.