मेरे प्यारे देशवासियों…..! पंतप्रधान मोदींचे भाषण कोण तयार करते? अखेर मिळाले उत्तर

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाची नेहमीच चर्चा होत असते. पंतपधान मोदी वेगवेगळ्या ठिकाणी आणि विषयांवर भाषण देतात. हिंदी, इंग्रजी भाषांमध्ये भिन्नविभीन्न  परिस्थितीमध्ये एका खास शैलीत भाषण देतात. अशामध्ये पंतप्रधानांचे भाषण कोण तयार करते? असे अनेक प्रश्न जनतेच्या मनात येतात. याचे उत्तर आता मिळले आहे. स्वतः पंतप्रधान कार्यालयानेच या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

पंतप्रधान मोदींचे भाषण कोण तयार करते, यासाठी किती लोकांची टीम कार्यरत असते, भाषण कोण लिहिते आणि यावर किती खर्च होते? असे प्रश्न एका इंग्रजी वृत्तवाहिनीने माहितीच्या अधिकाराखाली पंतप्रधान कार्यालयाला विचारले होते. या प्रश्नांची उत्तरे आता पंतप्रधान कार्यालयाने दिली आहेत.

कोण तयार करते पंतप्रधान मोदींचे भाषण?

माहितीच्या अधिकाराखाली देण्यात आलेल्या माहितीनुसार, ज्याप्रमाणे कार्यक्रम असतो. त्यानुसार वेगवेगळे लोक, अधिकारी, विभाग आणि संघटनांशी चर्चा करून भाषणासाठी माहिती गोळा करण्यात येते. या माहितीला भाषांचे अंतिम स्वरूप स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी देतात.

तसेच, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंपासून नरेंद्र मोदींपर्यंत प्रत्येक पंतप्रधानांचे भाषण तयार  करण्यासाठी पार्टी युनिट्स, मंत्रालय, विषय तज्ज्ञ आणि पंतप्रधानांची खाजगी टीम अशा विभिन्न माहितीच्या स्रोतांचा वापर केला जातो. यातही जवाहरलाल नेहरू आपले भाषण तयार करण्यासाठी अधिक वेळ देत होते, असेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदींचा भाषणावर किती खर्च केला जातो? याबाबतचा तपशील पंतप्रधान कार्यालयाने दिलेला नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.