कोल्हापूर – रडणारा नव्हे लढणारा माझा कार्यकर्ता आहे, असे उद्गार आमदार हसन मुश्रीफ यांनी काढले. विरोधी पक्ष म्हणून भविष्यात रस्त्यावरील संघर्षासाठी सज्ज रहा, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले. कागलमध्ये कागल, गडहिंग्लज – उत्तर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
गेल्या अडीच वर्षातील सत्तेचा विकासकामे आणि जनतेसाठी पुरेपूर उपयोग केला. येणारी 10 ते 15 वर्षे गरज पडणार नाही, एवढी प्रचंड विकासकामे केली. आत्ता बिळातले विरोधक बाहेर पडून करतो म्हटले तरी त्यांना करायला कामच शिल्लक नाही, असेही ते म्हणाले. यावेळी कागल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ यांनी मनोगत व्यक्त केले.