करोना लसीला मुस्लिम राष्ट्रांचा आक्षेप?

प्राण्याच्या मासांपासून बनवलेल्या जीलेटीनला विरोध

नवी दिल्ली – करोनाला थोपवण्यासाठी लसीकरण सुरु करण्यात आले आहे. भारतामध्येही सीरम, फायझर, भारत बायोटेकसारख्या कंपन्यांनी लसीच्या आपत्कालीन वापरासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. मात्र, कोरोना लसीबाबत नवा वाद निर्माण झाला आहे.

लसीच्या निर्मिती प्रक्रियेला घेऊन इस्लामिक देशांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे अनेक कंपन्यांकडून तयार करण्यात येत असलेल्या करोना लसी धर्मसंकटकात सापडल्या आहेत.

जगातील अनेक इस्लामिक देशांनी लसीकरणाला विरोध केला आहे. या देशांनी लसींवर गंभीर स्वरुपाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. या लसींच्या उत्पादन प्रक्रियेवर इस्लामिक देशांना आक्षेप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, करोना लसीला स्टॅबेलाईज करण्यासाठी जिलेटीनचा उपयोग केला जातो.

या जिलेटीनमुळे लसीची साठवणूक आणि वाहतूक प्रभावीपणे करता येते. तसेच लसीच्या सुरक्षिततेची क्षमताही वाढते. मात्र, असोशिएट प्रेस या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार इस्लामिक देशांनी याच कारणामुळे लसीकरणाला विरोध केला आहे.

इस्लामनुसार विशिष्ट प्राण्याच्या मासापासून तयार करण्यात आलेली कोणतीही वस्तू वर्ज्य आहे. या सर्व गोष्टींना हराम समजले जाते. त्यामुळे इस्लामिक लॉनुसार कोरोना प्रतिबंधक लसीदेखील हराम आहेत, असे इस्लामिक देशांचे मत आहे.

मुळात हा वाद ऑक्‍टोबर महिन्यापासून सुरु झाला. इंडोनेशियन अधिकारी आणि काही इस्लामिक धर्मगुरु करोना लसीवर चर्चा करण्यासाठी चीनला गेले होते. या भेटीदरम्यान लसीबाबत करार होणार होता. मात्र, चौकशीदरम्यान लस निर्मितीची पद्धती, जिलेटीनच्या वापराची माहिती मिळाली आणि इस्लामिक धर्मगुरुंनी करोना लसीवर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली.

फायझर, मॉडर्ना, ऍस्ट्रेझेनेकाला द्यावे लागले स्पष्टीकरण
लसीकरणाचा हा वाद वाढल्यामुळे फायझर, मॉडर्ना, ऍस्ट्रेनेझेनेका या लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना स्पष्टीकरण द्यावे लागले. या कंपन्यांनी करोना लस जिलेटीनवीना तयार करत असल्याचे सांगितले.

अमेरिकन कंपनी फायझर मॉडर्ना आणि ब्रिटिश कंपनी ऍस्ट्रेझेनेका यांनी नोटीस प्रसिद्ध करुन त्यांनी तयार केलेल्या लसी वापरण्यास कुठलीही अडचण नसल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, विशिष्ट प्राण्याच्या मासाचा वापर न केल्याचे स्पष्टीकरण दिल्यानंतरच कुठल्याही कंपन्यांना लसीकरणाची परवानगी देण्यात येईल अशी भूमिका इंडोनेशियाने घेतली आहे.

तर इस्लामिक मेडिकल असोसिएशनचे महासचिव डॉ. सलमान वकार यांनी मुस्लीम देशांबरोबरच अनेक देशांना करोना लसीबद्दल आक्षेप असल्याचा दावा केला आहे. तसेच, सीडनी विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. हरनूर राशिद यांनी जिलेटीनचा उपयोग हा समान्य बाब असल्याचे सांगितले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.