सोमेश्वरनगर (प्रतिनिधी) : मुस्लिम धर्मियांचा पवित्र महिना रमजान सुरू आहे. गेली ३० दिवस मुस्लिम बांधव व महिला रमजानचे रोजे (उपवास) करतात. दिवसभरात पाचवेळा घरातच नमाज अदा केले जात आहे. सोमवार दि.२५ मे रोजी रमजान ईद आहे. ईद निमित्त मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव मशिदीत किंवा समोर येऊन नमाज अदा करतात. यावर्षी जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे.
कोव्हिड १ ९ विषाणूचा प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन झाल्याने लोकांनी एकत्रित येऊन असे धार्मिक कार्यक्रम करण्यास मज्जाव केला आहे. तरी तालुक्यातील वडगांव निंंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ६२ गावांमध्ये येणाऱ्या मुख्य पणदरे , सुपा , को-हाळे , वडगांव, मुरूम, गावांतील मुस्लिम बांधवांना ईद निमित्त एकत्रीत नमाज करु नये, यावर्षी कोरोनाचा वाढता प्रभाव पाहत लोकांनी एकत्रीतपणे नमाजपठण न करता स्वतःच्या घरातच नमाजपठण करावे असे आवाहन वडगांव निंंबाळकर सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुभाष मुंढे यांनी केले आहे.