Sarfaraz’s brother Musheer Khan create history in the U19 World Cup : मुशीर खान अंडर-19 विश्वचषकात सातत्याने चांगली कामगिरी करताना दिसत आहे. त्याने स्पर्धेतील दुसरे शतक झळकावले. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सुपर सिक्सच्या सामन्यात मुशीरने आपले दुसरे शतक झळकावले. या शतकासह, मुशीर अंडर-19 विश्वचषकात दोन शतके झळकावणारा शिखर धवननंतरचा दुसरा भारतीय ठरला. याआधी मुशीरने आयर्लंडविरुद्ध शतक झळकावले होते.
दरम्यान, यापूर्वी शिखर धवनने असा कारनामा करुन दाखवला होता. त्याने 2004 मध्ये झालेल्या अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत 3 शतकं झळकावली होती.
या शतकापूर्वी मुशीरने अमेरिकेविरुद्ध खेळलेल्या डावात अर्धशतक झळकावले होते. अमेरिकेविरुद्ध मुशीरने 76 चेंडूंत 6 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 73 धावांची खेळी केली. त्याआधी आयर्लंडविरुद्ध मुशीरने 106 चेंडूंत 9 चौकार आणि 4 षटकारांसह 118 धावा केल्या होत्या.
Jay Shah : आयसीसीच्या Chairman पदावर जय शाहची नजर, त्यासाठी देऊ शकतात ‘या’ पदाचा राजीनामा….
न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर मुशीर किवी गोलंदाजांवर भारी पडला. या शतकासह मुशीर या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर पोहोचला आहे.
मुंबईकडून खेळणाऱ्या मुशीरने आतापर्यंत केवळ तीन प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. डिसेंबर 2022 मध्ये त्याने प्रथम श्रेणीत पदार्पण केले. त्याने 3 सामन्यांच्या 5 डावात 96 धावा केल्या. याशिवाय गोलंदाजीत त्याने 2 बळी घेतले.