Divya Deshmukh : ‘खेळ नाही, केस-कपडे-चेहरा पाहतात..’ भारतीय बुद्धिबळपटू दिव्याचे प्रेक्षकांवर गंभीर आरोप, जाणून घ्या…काय आहे प्रकरण

Divya Deshmukh calls out misogyny in chess – आघाडीची भारतीय बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिने नेदरलँड्समधील विज्क आन झी येथे नुकत्याच पार पडलेल्या टाटा स्टील मास्टर्स स्पर्धेत प्रेक्षकांकडून लैंगिक वर्तनाचा त्रास सहन करावा लागल्याचा आरोप केला आहे. दिव्याने म्हटले आहे की, सामना सुरु असताना प्रेक्षक तिचे केस, कपडे आणि अप्रासंगिक गोष्टींवर लक्ष वेधत होते.
गेल्या वर्षी आशियाई महिला बुद्धिबळ चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या नागपूरच्या १८ वर्षीय इंटरनॅशनल मास्टरने एक लांबलचक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये महिला खेळाडूंना नियमितपणे सामोरे जावे लागत असलेल्या गैरसोयीबद्दल माहिती दिली आहे. तसेच नुकत्याच नेदरलँड्समध्ये संपलेल्या विज्क आन क्झी मधील तिच्या अप्रिय अनुभवाचे वर्णन केले आहे.
View this post on Instagram
दिव्या म्हणते की, मला काही काळापासून याकडे लक्ष वेधायचे होते. पण मी माझी स्पर्धा संपण्याची वाट पाहत होते. बुद्धीबळातील महिलांना प्रेक्षक कसे गृहीत धरतात, हे देखील मला या निमित्ताने कळले, असे देशमुख म्हणाले.
दिव्य देशमुखने टाटा स्टील मास्टर्समध्ये चॅलेंजर्स विभागात ४.५ फिडे गुणांसह १२ वे स्थान पटकावले. ती म्हणाली की, जेव्हा स्त्रिया बुद्धिबळ खेळतात तेव्हा ते खरोखर किती आव्हानात्मक आणि चांगले असते, याचे प्रेक्षकांना काही देणेघेणे नसते. जणू काही बुद्धीबळ ही पुरुषांचीच मक्तेदारी आहे, अशा समजात ते महिला खेळाडूंचा खेळ आणि त्यांची क्षमता याकडे दुर्लक्ष करतात.
सामना सुरु असताना खेळाडूचा पेहराव, तिचे केस आणि अशा अन्य गोष्टींबद्दल बोलून खेळाडूंचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करणे, आक्षेपार्ह आहे, असे मला वाटते. बुद्धीबळातील महिला खेळाडूंचे सर्वसाधारणपणे कमी कौतुक केले जाते आणि त्यांना अनेकदा द्वेष सहन करावा लागतो.





