नाशिकमध्ये पैसे वाटप होत असल्याचा संजय राऊतांचा आरोप; म्हणाले “दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा…”

Sanjay Raut On Eknath Shinde| लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज 13 मे रोजी पार पडत आहे. राज्यात जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, नंदूरबार, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या 11 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. मात्र मतदानाच्या दिवशी पैसे वाटप झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर आहेत. यादरम्यानचा एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरमधून उतरतानाचा एक व्हिडिओ संजय राऊत यांनी पोस्ट केला आहे. संजय राऊत यांनी ‘एक्स’ वर पोस्ट केलेल्या व्हिडिओला ‘मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण!’ असं कॅप्शन दिले आहे.
मुख्यमंत्री खाऊ घेऊनआलेतोक्षण!
नाशिक मध्ये रात्रीस खेळ चाले. नुसता पै पाऊस…
दोन तासांच्या दौऱ्या साठी इतक्या जड बॅगा पोलिस का वाहातआहेत?
यातून कोणतामाल नासिकला पोहचला?
निवडणूकआयोग फालतू नाकाबंदीआणि झडत्या करत आहे.महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरुआहे.
@ECISVEEP pic.twitter.com/2gOaPxVeZm— Sanjay Raut (@rautsanjay61) May 13, 2024
‘नुसता पै पाऊस पडतोय’ संजय राऊतांचा दावा Sanjay Raut On Eknath Shinde|
‘नाशिकमध्ये रात्रीस खेळ चाले. नुसता पै पाऊस पडतोय. ‘दोन तासांच्या दौऱ्या साठी इतक्या जड बॅगा पोलिस का वाहात आहेत? यातून कोणता माल नाशिकला पोहचला?’ अस सवाल संजय राऊत यांनी केला आहे. “निवडणूक आयोग फालतु नाकाबंदी आणि झडत्या करत आहे. महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरु आहे” असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे जेव्हा नाशिक येथे हेलिकॉप्टरने पोहचले, तेव्हा त्यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या तसेच पोलिसांच्या हातात मोठमोठ्या बॅग होत्या.
अहमदनगरमध्येही पैसे वाटल्याचा आरोप Sanjay Raut On Eknath Shinde|
यावरून संजय राऊत यांनी नाशिकमध्ये पैसे वाटले जात असल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार गट ) यांच्याकडून अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप करण्यात येत आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून हे पैसे वाटआल्याचा आरोप मविआचे उमेदवार निलेश लंके यांनी केलाय. त्यासाठी त्यांनी त्याच्या सोशल मीडिया हँडलवर काही व्हिडीओ शेअर केले आहेत
नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरले आहेत. तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे रिंगणात आहेत. पण मतदानापूर्वी नाशिकमध्ये पैसे वाटप केल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, तिसऱ्या टप्प्याच्या मतदानावेळी सुद्धा पैसे वाटपाचे आरोप झाले होते. बारामतीमध्ये अजित पवार गटाकडून पैसे वाटप झाल्याचा त्यांचा आरोप होता. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पैसे वाटपाचे व्हिडिओ X वर पोस्ट केले होते.





