पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ब क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत पवना नदीपात्रालगत जाधवघाट रावेत येथील अनधिकृत पत्राशेडवर बुधवारी (दि. 16) कारवाई करण्यात आली. महापालिकेचे बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग व ब क्षेत्रीय कार्यालय यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. या कारवाईमध्ये चार आरसीसी बांधकामे, 11 पत्राशेड व एक वीट बांधकाम असे 3444 चौ.मी अनाधिकृत बांधकामे निष्कासित केली.
ही कारवाई सहशहर अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता संजय भोसले यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आली. उपअभियंता दिपक करपे, मनाली स्वामी व कनिष्ठ अभियंता प्रविण धुमाळ, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक दिनेश नेहरकर व अमोल पवार यावेळी उपस्थित होते. मनपा कर्मचारी व अतिक्रमण विभाग कर्मचारी तसेच मनपा पोलिस कर्मचारी व रावेत पोलीस स्टेशनचे तीन पोलीस उपनिरीक्षक, 20 पोलीस कॉन्स्टेबल, महाराष्ट्र पोलीस सुरक्षाबल 20 कर्मचारी यांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. तीन जेसीबी, 2 ट्रॅक्टर, 2 बकेट तसेच 15 मजूर यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.