मुंबईकरांना कचऱ्यासाठी मोजावे लागणार अतिरीक्‍त पैसे ?

मुंबई : मुंबईकरांना यापुढे कचरा करतेवेळी थोडा विचार करावा लागणार आहे. कारण पालिकेकडून कचाऱ्यावर अतिरीक्‍त कर लावण्याचा विचार सुरू आहे. गेल्यावर्षी कचऱ्यावर कर लावण्यात न आल्याने स्वच्छ सर्वेक्षणामध्ये मुंबईचे मानांकन घसरले होते त्यामुळे अतिरीक्त कराचा विचार पालिका करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

कचऱ्यावर कर लावण्यासंबंधी कोणताही निर्णय झाला नाही यावर सध्या विचारमंथन होत आहे. हे झाल्यानंतर पालिका यावर प्रस्ताव आणणार असल्याचेही म्हटले जात आहे. यातही जे नागरिक ओला-सुका कचरा वेगळा करतील आणि त्यातून पुढे म्हणजे ओल्या कचऱ्याची विल्हेवाट आपल्याच जागेत लावतील त्यांना पालिका मालतत्ता करात 10 टक्‍के सुट देणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.