मुंबई – मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी एका निनावी फोनद्वारे देण्यात आलीय. त्यानंतर मंत्रालयात बॉम्बशोधक पथक दाखल झालं असून कथित बाॅम्बचा तपास सुरु आहे.
मंत्रालयातील कंट्रोल रूमकडून मिळालेल्या माहितीनुसार, साधारणतः तासाभरापूर्वी एक निनावी फोन आला होता. त्या फोनवर मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचं सांगण्यात आलं. याची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली आणि त्यानंतर पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाला पाचारण करण्यात आलं आहे.
दरम्यान, मंत्रालय परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच फोन कोणी केला याबाबतची माहिती तपासण्यात येत आहे.