मुंबई : मुंबईमध्ये सर्व प्रकारची परिस्थिती हाताळण्यासाठी मुंबई पोलिस यंत्रणा ही कार्यक्षम व सक्षम आहे. याठिकाणी आर्मीची नियुक्ती होणार ही निव्वळ अफवा आहे, असे स्पष्टीकरण गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.
कोरोना पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये आर्मीची नियुक्ती होणार असल्याच्या अफवा काही समाज माध्यमांवर फिरत आहेत. त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये. आपली मुंबईची पोलिस यंत्रणा जागतिक पातळीवर नावाजलेली आहे. सध्याच्या परिस्थितीत मुंबई पोलीस यंत्रणा अत्यंत सक्षमतेने कार्यरत आहे. त्याबद्दल कोणीही मनात शंका ठेवू नये, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.