मुंबई : देशात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मुंबईतील एका पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईतील वाकोलो पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले ५७ वर्षीय हेड कॉन्स्टेबललाकोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरु असताना शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. तर, रविवारी एका ५२ वर्षीय हेड कॉन्स्टेबलचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ते संरक्षण शाखेत कार्यरत होते. मुंबई पोलिसांनी ट्विटरद्वारे याची माहिती दिली.
दरम्यान, महाराष्ट्रात आतापर्यंत ९७ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाचो बाधा झाली आहे. त्यात २० अधिकाऱ्यांचा समावेश असून ८७ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. त्यापैकी ३ पोलीस अधिकारी आणि ४ पोलीस कर्मचारी कोरोनातून बरे झाले आहे.
राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबईत आढळले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रसाशनाचे प्रयत्न सुरु आहेत.