मुंबई पुन्हा तुंबली!

मुंबई – वातावरणीय बदलाची स्थिती लक्षात घेत, हवामान विभागाने मुंबई, पुण्यात ‘रेड अलर्ट’ जाहीर केला आहे. पुढील दोन दिवस अति मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. सोमवारी संध्याकाळपासून मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

मुंबईत सोमवारी रात्रीपासूनच मुसळधार पावसाळा सुरुवात झाली आहे. यामुळे हिंदमाता, दादर टीटी, शक्कर पंचायत, एसआयईएस महाविद्यालय, भेंडी बाजार जंक्शन, षण्मुखानंद हॉल, गोयल देऊळ, शेख मिस्त्री दरगाह मार्ग येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

दरम्यान, भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबई शहर व उपनगरात आज मुसळधार पावसाची शक्यता असून समुद्रास दुपारी १२.४७ वाजता भरती येणार आहे. अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, समुद्रकिनारे तसेच पाणी भरलेल्या ठिकाणापासून लांब राहावे, असे  आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे. याशिवाय ६ अग्निशमन केंद्रावर पूर बचाव पथक तैनात करण्यात आले आहे. याशिवाय एनडीआरएफच्या तीन तुकड्यांना सज्ज राहण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.