मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत आणि उपनगरांत शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे मुंबईच्या रस्त्यावर आणि सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतुकीचा पुर्ण खोळंबा होत आहे. दरम्यान, पुढच्या 48 तासांत हवामान विभागाकडून मुंबईसह उपनगरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरात शुक्रवार सकाळपासूनच पावसाने जोर धरला. पूर्व आणि पश्चिम उपनगरात सायन, कुर्ला, वांद्रे-कुर्ला संकुल, साकिनाका, अंधेरी, पवई, विद्याविहार, घाटकोपर, कांजूरमार्ग, भांडुप, मुलुंड, पवई, विलेपार्ले, जोगेश्वरी, मालाड परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली.
Maharashtra: Palghar Collector Kailash Shinde has issued orders that all schools & colleges in Palghar will remain closed today, in view of continuous rainfall in the area. https://t.co/zyLq3fIgRB
— ANI (@ANI) August 3, 2019
दरम्यान ठाणे, पालघर भागातील शाळा आणि कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.