हडपसर – “मुख्यमंत्री केसरी-2023 बैलगाडा शर्यतीचे आयोजन करून महाराष्ट्राची ओळख असलेल्या बैलगाडा शर्यतीच्या परंपरेला जपण्याचे काम माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी केले आहे, असे मत राज्याचे उच्च शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
पुण्यात प्रथमच मुख्यमंत्री केसरी-2023 बैलगाडा शर्यतीचे आयोजन शिवसेना शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी बक्षीस वितरण समारंभात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, युवा सेना संपर्कप्रमुख किरण साळी, शहर सहसंपर्क प्रमुख अजय भोसले, जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, जिल्हाप्रमुख उल्हास तुपे, भागवत बाणखेले, सम्राट थोरात, उद्योजक बाळासाहेब भानगिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पठारे,उपशहरप्रमुख सुनील जाधव, राजेंद्र भानगिरे यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, बैलगाडाप्रेमी उपस्थित होते.
या शर्यतीत महाराष्ट्रातील विविध बैलगाडा शर्यती गाजवणारे “बकासुर’, “सुंदर’, “बलमा’, “रायफल’, “सरदार’ आदी बैल सामील झाले होते. प्रथम क्रमांक जय गणेश प्रसन्न महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड यांचा बैलगाडा, द्वितीय क्रमांक निसर्ग गार्डन कात्रज, तृतीय क्रमांक नाथसाहेब प्रसन्न मोहिलशेठ धुमाळ यांनी, तर चतुर्थ क्रमांक पीर साहेब प्रसन्न सुभाषदादा मोडक, पाचवा क्रमांक श्री कन्या प्रमोद शेठ घुले पाटील, सहावा क्रमांक जीवन भानगिरे, सातवा क्रमांक काळ भैरवनाथ प्रसन्न उरुळी देवाची यांनी पटकावला. विजेत्या संघाना ट्रॅक्टर, बुलेट, दुचाकी आदी बक्षीस पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आली.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी उद्योगपती बाळासाहेब भानगिरे आणि माजी नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली जीवन भानगिरे, करण भानगिरे, प्रज्वल भानगिरे, सचिन भानगिरे, आकाश भानगिरे, अजय भानगिरे, सिद्धांत भानगिरे, सचिन तरवडे, अभि भानगिरे, अमित दाभाडे, विनायक पाटील, अभिजित बाबर, राजू गवळी, अमोल जगताप, प्रकाश कलगुटकर यांनी पुढाकार घेतला.