mukhar ansari funeral- डॉन मुख्तार अन्सारी यांच्यावर आज त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. मुहम्मदाबाद येथील युसूफपूर गावात दफनविधी पार पडला. निरोप देण्यापूर्वी नमाज अदा करण्यात आली. यानंतर अन्सारी यांची अंत्ययात्रा मोठ्या गर्दीत घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या कालीबाग येथील स्मशानभूमीत पोहोचली.
मुख्तार अन्सानी यांना स्मशानभूमीत पूर्ण विधीपूर्वक दफन करण्यात आले. यावेळी केवळ कुटुंबातील सदस्यांनाच स्मशानभूमीत जाण्याची परवानगी होती. स्मशानभूमीबाहेर अन्सारी यांच्या समर्थकांचा मोठा जमाव जमला आणि त्यांनी घोषणाबाजी केली. गाझीपूर पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याची घोषणा केली आहे. व्हिडिओवरून त्यांची ओळख पटल्यानंतर घोषणाबाजी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
#MukhtarAnsari अमर रहे’, जनाजे में लगे नारे; सुनकर भड़की पुलिस की चेतावनी- वीडियो बनवाई, कार्रवाई करेंगे #ghazipurup pic.twitter.com/HZ5a4a8eUw
— Khushbu Goyal (@kgoyal466) March 30, 2024
पार्थिवाला स्पर्श करण्यासाठी लोकांमध्ये चेंगराचेंगरी –
गाजीपूरचे एसपी ओमवीर सिंग आणि डीएम आर्यका अखौरी यांनी मीडियाला निवेदन दिले की, या भागात कलम 144 लागू करण्यात आले होते, तरीही मुख्तार अन्सारीचे हजारो समर्थक जमा झाले. कलम 144 च्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागली. मुख्तार अन्सारीच्या अंत्यसंस्कारासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. मुख्तार अन्सारीच्या कुटुंबीयांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले होते.
रात्री उशिरा मृतदेह बांदा येथून गाझीपूरला पोहोचला –
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 19 वर्षे तुरुंगवास भोगलेल्या मुख्तार अन्सारी यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. स्लो पॉयझन देऊन त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला असला तरी पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पोस्टमॉर्टमनंतर मुख्तार अन्सारी यांचा मुलगा उमर अन्सारी मृतदेह घेऊन बांदा येथून गाझीपूरला पोहोचला. येथे मुख्तार अन्सारीच्या घराच्या गेटबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यानंतर सकाळची नमाज अदा केल्यानंतर मुख्तार अन्सारीची अंत्ययात्रा निघाली, ज्यामध्ये हजारो लोक जमले होते, तर मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.