Live Cricket Score, LSG vs PBKS Indian Premier League 2024 : आयपीएल 2024 च्या 11 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज आज आमनेसामने येणार आहेत. हा सामना एलएसजीच्या होम ग्राउंड एकना स्टेडियम, लखनऊ येथे संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल.
तत्पूर्वी, कर्णधार केएल राहुलच्या अनुपस्थितीत लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यष्टीरक्षक फलंदाजाऐवजी निकोलस पुरन संघाची धुरा सांभाळताना दिसत आहे.
🚨 Toss Update 🚨@LucknowIPL win the toss and elect to bat against @PunjabKingsIPL.
Follow the Match ▶️https://t.co/HvctlP1JOJ #TATAIPL | #LSGvPBKS pic.twitter.com/D3FiVVMBgo
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2024
या सामन्यात जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन, लियाम लिव्हिंगस्टोन आणि कागिसो रबाडा हे पंजाबसाठी परदेशी खेळाडू म्हणून खेळताना दिसणार आहेत. तर, क्विंटन डी कॉक, निकोलस पूरन आणि मार्कस स्टॉइनिस हे लखनौसाठी परदेशी खेळाडू म्हणून खेळताना दिसतील.
IPL 2024 (#LSGvsPBKS Match 11) : ‘गब्बर’ धवनला एक खास विक्रम नावावर करण्याची संधी, फक्त एक पाऊल दूर…
दरम्यान, लखनौने या मोसमातील पहिला सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळला. यामध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर पंजाबने या कालावधीत दोन सामने खेळले आणि एक जिंकला. पंजाब आणि लखनौचे संघ यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत.