Muhammad Waseem Six Record in International Cricket : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा षटकार मारण्याची किंवा षटकारांच्या विक्रमाची चर्चा होते तेव्हा पहिलं नाव समोर येतं ते म्हणजे भारतीय कर्णधार रोहित शर्मा. पण जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मापेक्षा मोठा सिक्स मारणारा फलंदाज आहे, असे जर आम्ही तुम्हाला सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही, पण तसे आहे. यूएईच्या मोहम्मद वसीमने रोहित शर्माचा विक्रम मोडला आहे.
यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होता, जो आता संयुक्त अरब अमिरातीच्या मुहम्मद वसीमच्या नावे झाला आहे. रोहित शर्माचा विक्रम मोडण्यासोबतच वसीमने एक खास विक्रमही केला जो आजपर्यंत कोणीही करू शकले नाही.
खरं तर, UAE चा वसीम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात 100 किंवा त्याहून अधिक षटकार मारणारा पहिला खेळाडू ठरला आहे. यापूर्वी, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात कोणत्याही फलंदाजाने 80 पेक्षा जास्त षटकार मारले नव्हते, 80 षटकार मारण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होता, जो आता मागे पडला आहे.
गेल्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये मुहम्मद वसीमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 101 षटकार लगावले, तर 80 षटकार मारणारा रोहित शर्मा आता दुसऱ्या स्थानावर ढकलला गेला आहे. वसीम 2023 मध्ये टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेट खेळला. त्याच वेळी, भारतीय कर्णधाराने 2023 मध्ये एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट खेळले. 2023 मध्ये रोहितने एकही T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार ठोकणारे फलंदाज…
2023 मध्ये 101 षटकार- मोहम्मद वसीम (युएई)
2023 मध्ये 80 षटकार – रोहित शर्मा (भारत)
2019 मध्ये 78 षटकार – रोहित शर्मा (भारत)
2018 मध्ये 74 षटकार – रोहित शर्मा (भारत)
2022 मध्ये 74 षटकार – सूर्यकुमार यादव (भारत)
#UAEvAFG 2nd T20 : अफगाणिस्तानचा पराभव करत यूएई संघानं रचला इतिहास…
दरम्यान, रोहित शर्माने 2023 मध्ये 35 सामने खेळले ज्यात त्याने 39 डावात 80 षटकार मारले. मात्र मोहम्मद वसीमने एका वर्षात केवळ षटकारांचे शतक ठोकले. त्याने 47 डावात 101 षटकार ठोकले आहेत. आतापर्यंत जगातील कोणत्याही फलंदाजाला एका कॅलेंडर वर्षात ही कामगिरी करता आलेली नाही. अफगाणिस्तानविरुद्ध रविवारी(31 डिसेंबर 2023) झालेल्या मालिकेतील दुसऱ्या टी-20 सामन्यात त्याने ही कामगिरी केली. वसीमने अफगाणिस्तानविरुद्ध 3 गगनचुंबी षटकार ठोकले आणि वर्षाचा शेवट 101 षटकारांसह केला.