UAE vs Afghanistan 2nd T20, Sharjah Cricket Stadium :- मुहम्मद वसीम आणि आर्यन लाक्रा यांच्या अर्धशतकानंतर, मुहम्मद जवादुल्ला आणि अली नसीर यांच्या घातक गोलंदाजीमुळे रविवारी(31 डिसेंबर 2023) यूएई संघाने इतिहास रचला. UAE ने प्रथमच अफगाणिस्तान (UAE VS AFG) विरुद्ध विजय नोंदवला. T-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात UAE ने अफगाणिस्तानचा 11 धावांनी पराभव केला. या विजयासह यूएई संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 2 जानेवारीला होणार आहे.
Defeat in Sharjah!
AfghanAtalan, led by @MohammadNabi007 (47), fought hard but were bundled out for 155 runs and fell 11 runs short of the target in the 2nd match. 👍
The decider to be played on Tuesday at the same venue. #AfghanAtalan | #UAEvAFG202324 pic.twitter.com/LmhFOoIYFd
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) December 31, 2023
या सामन्यात UAE (UAE VS AFG) संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर महंमद वसीम आणि आर्यन लाक्रा यांच्यात 8.3 षटकात 72 धावांची भागीदारी झाली. महंमद वसीमने अर्धशतक झळकावले आणि 32 चेंडूत 53 धावांची (चार चौकार, तीन षटकार) खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतला. आर्यन लाक्रानेही अर्धशतक झळकावले आणि 47 चेंडूत 63 धावा (तीन चौकार, चार षटकार) केल्यानंतर नाबाद राहिला. याशिवाय तनिस सुरीने 11 आणि अकिफ रझाने नाबाद 13 धावा केल्या. यूएई संघाने 20 षटकांत सात विकेट गमावत 166 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून अजमतुल्ला आणि कैस अहमद यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ 19.5 षटकांत महंमद जवादुल्लाह आणि अली नसीर यांच्या घातक गोलंदाजीमुळे 155 धावांत गारद झाला. मोहम्मद नबीने 27 चेंडूत सर्वाधिक 47 धावा केल्या. हजरतुल्ला झाझाईने 27 चेंडूत 36 तर रहमानउल्ला गुरबाजने 17 चेंडूत 21 धावा केल्या. यूएई संघाकडून गोलंदाजीत अली नसीरने चार षटकांत एका मेडनसह 24 धावांत चार बळी घेतले. त्याचवेळी मुहम्मद जावदुल्लाहनेही चार षटकांत 26 धावा देत चार फलंदाजांना आपले बळी बनवले.
मुहम्मद वसीमने केला विश्वविक्रम…
या सामन्यात यूएईचा सलामीवीर महंमद वसीमने विश्वविक्रम केला. 2023 मध्ये 100 षटकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावे नोंद झाला आहे. 2023 मध्ये मोहम्मद वसीमच्या नावावर 101 षटकारांची नोंद झाली आहे. एका वर्षात 100 षटकार मारणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. सिक्सर किंग रोहित शर्माही त्याच्या जवळपास नाही. रोहितने 2023 मध्ये 80 षटकार मारले आहेत.