MS Dhoni – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) हा जगभरातील सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे, ज्याचे लाखो चाहते आहेत. ‘कॅप्टन कूल’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या एम.एस धोनीचे चाहते प्रत्येक प्रकारे त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात.
मग तो त्याचा लुक असो किंवा हेलिकॉप्टर शॉट. दरम्यान, आज धोनी पुन्हा एकदा त्याच्या हेअरस्टाइलमुळे चर्चेत आला आहे. सध्या त्याच्या नवीन हेअरस्टाइलची (hairstyle) सोशल मीडियावर बरीच चर्चा होताना दिसत आहे.
खरं सांगायचं झालं तर एम.एस धोनी पुन्हा एकदा त्याच्या ‘कॅप्टन कूल’ या लुक मध्ये परतला आहे. यामध्ये धोनीने काळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला असून त्यावर गॉगल देखील घातला आहेत.
दरम्यान, धोनीचे हे स्वतः अलीम हकीमने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. धोनीचा फोटो पोस्ट करताना अलीम हकीम म्हणाले की, “कोणत्याही क्रिएटिव्ह व्यक्तीसाठी महेंद्रसिंग धोनीशी जोडले जाणे ही एक चांगली संधी आहे. त्यांच्या केसांना स्टाईल करून माझी कला दाखवण्याचा मान मला मिळाला याबद्दल मी सदैव कृतज्ञ आहे’. असं तो म्हणाले.