Asian Games 2023 NEP vs IND : आशियाई क्रीडा 2023 स्पर्धेमध्ये भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा पहिला सामना नेपाळ विरुद्ध होता. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताने नेपाळचा 23 धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यशस्वी जैस्वालच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर भारताने 20 षटकांत चार गडी गमावून 202 धावा केल्या. यशस्वी जैस्वालने 49 चेंडूत 8 चौकार आणि 7 षटकाराच्या मदतीने सर्वाधिक 100 धावा केल्या. तर रिंकू सिंगने 37, ऋतुराज आणि शिवम दुबेने प्रत्येकी 25-25 धावांचे योगदान दिले. नेपाळकडून गोलंदाजीत दीपेंद्र सिंगने दोन बळी घेतले. सोमपाल कामी आणि लामिछाने यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
प्रत्युत्तरात 203 धावांचा पाठलाग करताना नेपाळचा संघ नऊ गडी गमावून केवळ 179 धावा करू शकला. दीपेंद्र सिंगने सर्वाधिक 32 धावा केल्या. संदीप जोरा आणि कुशल मल्लाने 29 धावांचे, कुशल भुरटेलने 28 आणि करणने 18 धावांचे योगदान दिले. भारताकडून गोलंदाजीत रवी बिश्नोई आणि आवेश खान यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले तर अर्शदीपला दोन आणि आर साई किशोरला एक विकेट मिळाली.
Yashasvi Jaiswal's Maiden T20I 💯 powers India to a 23-run win against Nepal 👏#TeamIndia are through to the semifinals of the #AsianGames 🙌
Scorecard ▶️ https://t.co/wm8Qeomdp8#IndiaAtAG22 pic.twitter.com/3fOGU6eFXi
— BCCI (@BCCI) October 3, 2023
दरम्यान, चीनमध्ये 19 वी आशियाई क्रीडा स्पर्धा सध्या सुरु असून या स्पर्धेत क्रिकेटही यंदा खेळवले जात आहे. टीम इंडियाच्या मानांकनामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला होता.