शाहिदच्या आगामी ‘जर्सी’ चित्रपटात मृणालची वर्णी

मुंबई – सुपर 30 आणि बाटला हाऊस या चित्रपटांमधील दमदार अभिनयानंतर अभिनेत्री मृणाल ठाकूर आता आगामी ‘जर्सी’ या चित्रपटात दिसणार आहे. या दोन चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगलच यश मिळाल होता. जर्सी हा चित्रपट तेलुगु चित्रपटाचा रिमेक आहे. मूळ तेलुगु चित्रपटाचे दिग्दर्शक गौतम तिन्नानुरी हेच या हिंदी रिमेकचे दिग्दर्शन करणार आहेत. चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.

या चित्रपटात अभिनेता शाहिद कपूर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. शाहिद आणि मृणाल या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. कबीर सिंगच्या यशानंतर शाहिदला साऊथ रिमेकच्या चित्रपटांसाठी चांगलीच मागणी मिळताना पहायला मिळतेय. जर्सी हा चित्रपट एक स्पोर्टस ड्रामा आहे. शाहिदने कबीर सिंगमध्ये बरीच मेहनत केली होती, त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली होती. आता जर्सी चित्रपटातून शाहिद आणि मृणाल प्रेक्षकांची मने जिंकण्यात कितपत यशस्वी ठरतील, हे आगामी काळात दिसून येईलच.

Leave A Reply

Your email address will not be published.